हिंगोलीत क्षुल्लक कारणावरून दोन गटांत हाणामारी, 41 जणांवर गुन्हा दाखल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल हिंगोली शहरातील रिसालाबाजार भागात रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास काही तरुण सोनारगल्ली भागात बसले होते . यावेळी त्या ठिकाणी आलेल्या काही तरुणांना दगड मारण्यास सुरवात केली . त्यामुळे वादाला तोंड फुटले . या वादातून हाणामारी सुरु झाली . दोन्ही कडून मोठा जमाव एकत्र आला होता . यामध्ये काही जणांनी तलवारीचाही वापर केल्याचे सांगण्यात आले .