भिवंडीत महिलेची वाहतूक पोलिसांवर दादागिरी! शिवीगाळ करत महिलेने पोलिसांनाच दिल्या धमक्या..
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभिवंडीच्या राजणोली नाका परिसरात कोनगाव वाहतूक पोलिसांची वाहन चालकांविरोधात कारवाई सुरू आहे आणि हीच कारवाई सुरू असताना चालकाने सीटबेल्ट न लावल्याने चारचाकी वाहनावर कार्यवाही करण्यास गेले असता, चार चाकीतील महिलेने वाहतूक पोलिसांशी चांगलाच वाद घातला आहे. हा वाद तब्बल तासभर सुरू होता, दरम्यान महिलेने पोलिसांना शिवीगाळ करत धमकावले देखील हा वाद वाढत असल्याने शांतीनगर पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी महिला पोलिस दाखल होताच महिलेने माफीनामा लिहून दिलाय. तसेच पोलिसांनी सीटबेल्ट न लावल्याने दंड ही वसूल केला आहे.