Farmers Lost Crop : राज्यातला शेतकरी वाऱ्यावर ,सोयाबीन, कापूस, धान आणि भाजीपाल्याचं मोठं नुकसान
राज्यात गेल्या महिन्याभरापासून सत्तेचा खेळ सुरु आहे. बंडखोरी, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री, कोण गद्दार, कोण निष्ठावान, कुणाला कोणतं निवडणूक चिन्ह अशा राजकारणात मात्र राज्यातला शेतकरी वाऱ्यावर असल्याचे समोर आलंय. राज्यात शिंदे सरकार येऊन जवळपास २५ दिवस उलटलेत. मात्र जुलैमधील पावसामुळे नुकसान झालेले शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. जुलैमध्ये झालेल्या पावसात राज्यातील आठ लाख हेक्टरवरील पिकं पाण्याखाली गेलीत. सोयाबीन, कापूस, धान आणि भाजीपाल्याचं मोठं नुकसान झालंय.. नांदेड जिल्ह्यांत सर्वाधिक अतिवृष्टीचा फटका बसला असून तेथील २ लाख ९७ हजार हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन, फळपिकांचे नुकसान झालं. विदर्भात जवळपास अडीच लाख हेक्टरवरील पिकं पाण्यात गेलीत. वर्धा, नागपूर, गडचिरोलीला पावसाचा सर्वाधिक फटका बसलाय. त्यामुळे नुकसानाचे पंचनामे कधी होणार, मायबाप सरकार मदत कधी करणार असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित करण्यात येतोय.,