BEST Employees कोरोनामुळे मृत्यू झालेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्याला बेस्टमध्ये नोकरी
Continues below advertisement
मुंबई : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना बेस्टकडून नोकरी देण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत चार मृत व्यक्तींच्या नातलगांना बेस्टने सेवेत सामावून घेण्याचे आदेश दिले आहेत. उर्वरित व्यक्तींच्या नातेवाईकांना बेस्ट लवकरच सेवेत सामावून घेणार आहे. बेस्टकडून कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक आधार म्हणून ही नोकरी दिली जात आहे.
Continues below advertisement