SSC Exam |विद्यार्थ्यांना दिलासा! दहावी बोर्ड परीक्षा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ,25 जानेवारीपर्यंत अवधी
मुंबई : दहावी बोर्ड परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी बोर्डाकडून मुदतवाढ देण्यात आली. आता विद्यार्थी 25 जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज भरु शकतील. एबीपी माझाने बातमी दाखवल्यानंतर बोर्डाकडून अर्ज भरण्यासाठीच्या मुदतवाढीबाबत परिपत्रक जाहीर करण्यात आलं आहे. दहावी बोर्ड परीक्षेचे आता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आज 11 जानेवारी ही अंतिम मुदत होती. आता ही अवधी 25 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे.