Amol Kolhe On Bailgada Sharyat : माझ्या प्रत्येक बैलगाड्या मालकाचं स्वप्न पूर्ण झालं - खा.अमोल कोल्हे ABP MAJHA
राज्यात बैलगाडा शर्यतीवर गेली सात वर्षे असलेली बंदी अखेर उठली आहे. राज्यात बैलगाडा शर्यतींना सर्वोच्च न्यायालयानं सशर्त परवानगी दिलीय. त्यामुळे तब्बल ७ वर्षांनी राज्यात बैलगाडा शर्यतींचा धुरळा उडणार आहे. यानंतर हे प्रकरण घटनापीठाकडे जाणार आहे. त्यामुळे अर्धी लढाई राज्यानं जिंकली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर बैलगाडा राज्यात मालकांनी जल्लोष केला. 2017 साली मुंबई हायकोर्टानं बैलगाडा शर्यतींवर बंदी घातली. त्यानंतर ही बंदी उठवण्यासाठी विधानसभेपासून लोकसभेपर्यंत मागणी झाली. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं.. आणि आता बंदी उठल्यानं चांद्यापासून बांद्यापर्यंत जल्लोष साजरा केला जातोय..