माझा इम्पॅक्ट | सांगलीतील 400 वर्ष जुन्या वटवृक्षासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा पुढाकार

मुंबई : सांगली येथील राष्ट्रीय महामार्गाच्या कामामध्ये येणारा चारशे वर्ष पुरातन असलेला वटवृक्ष वाचवण्यासाठी अनेक पर्यावरण प्रेमींनी मोहीम हाती घेतली आहे. एबीपी माझानेही हा प्रश्न उचलून धरला होता. याची दखल पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही घेतली आहे. यासंदर्भात आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून विनंती केली आहे. त्याचबरोबर सांगली जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करुन हा वटवृक्ष वाचविण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना दिल्या.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola