राजावाडी रुग्णालयात लसीकरणावेळी कंटाळा येऊ नये म्हणून मधुर संगीत, पेंटिंग्ज लावून मनोरंजन!
जेष्ठ नागरिक आणि दुर्धर आजाराने ग्रस्त नागरिकांना कोव्हिड लसीकरणला सुरुवात करण्यात आली आहे.मात्र अचानक लसीकरण केंद्रावर गर्दी आणि त्यात कोव्हीन अँपच्या बिघाडाने अनेक ठिकाणी याचा फज्जा उडताना दिसतो आहे.मात्र पूर्व उपनगरातील राजावाडी रुग्णालयात मात्र लसीकरण सुरळीत आणि शिस्तबद्ध पद्धतीने आणि खेळी मेळीत होताना दिसते आहे.एक दिवसात सहाशे नागरिकांना लस देण्याचे लक्ष या रुग्णालयात आहे.राजावाडी रुग्णालयाने भव्य असे रुग्णालयाच्या मुख्य इमारतीपासून वेगळे शेड उभारले आहे.यात पाच लसीकरण केंद्र आणि तीन विभाग उभारले आहेत.ज्यात दोन प्रतीक्षालय आणि एक निरीक्षणालय आहे.यात शारीरिक अंतर ठेवून बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.या ठिकाणी हवेशीर व्यवस्था, विविध पेंटींग आणि मधुर संगीत लावण्यात आले आहे.यामुळे इथे जेष्ठ नागरिक कंटाळताना दिसत नाहीत. यामुळे या केंद्रावर कोणताही गोंधळ तर नाहीच उलट शिस्तबद्ध आणि शांततेत लसीकरण सुरू असल्याचे दिसते आहे.याबद्दल जेष्ठ नागरिकांनीदेखील आनंद व्यक्त केला आहे.