औरंगाबादमध्ये वक्फ बोर्डाच्या जागेवर अतिक्रमण, दोषींवर गुन्हे दाखल न झाल्यास उपोषण - इम्तियाज जलील

Continues below advertisement

औरंगाबाद शहरातील जालना रोडवर वक्फ बोर्डाच्या जागेवर अतिक्रमण करून नियमबाह्य इमारती बांधल्याचा आरोप  खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे.  ही मोक्याची जागा किमान 100 कोटींची आहे.दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत  अशी जलील यांनी मागणी केली. अन्यथा 26 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करणार असल्याचं सांगत त्यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आल्यास जबाबदारी प्रशासनाची असेल असा इशारा जलील यांनी दिलाय. वक्फच्या नियमानुसार ती जागा विकू शकत नाही  तरी सुद्धा  या 1 लाख square फीट जागेची विक्री करण्यात आली आणि मोठे शपिंग कॉम्प्लेक्स बांधण्यात आले आहे असा आरोप जलील यांनी केला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram