Gram Panchayat Election | गडचिरोलीत 150 ग्रामपंचायतींसाठी उद्या निवडणूक, CRPF आणि SRPF चे जवान तैनात

गडचिरोली : जिल्हयातील ग्रामपंचायत निवडणूकीच्या दुसऱ्या टप्प्यात 20 जानेवारी रोजी 150 ग्रामपंचायतींमध्ये प्रत्यक्ष मतदान होणार असून त्याची तयारी अंतिम टप्याात आली आहे. 20 जानेवारी रोजी सकाळी ठिक 7.30 वा ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत जिल्हयातील सहा तालुक्यात होणार आहे.चामोर्शी, मूलचेरा, अहेरी, एटापल्ली, भामरागड व सिरोंचा तालुक्यातील 486 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये संबंधित गावातील मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola