Grampanchayat Election | आदर्श गावांमध्ये निवडणुकांची रणधुमाळी, हिवरेबाजार, राळेगणसिद्धी, पाटोद्यात धुरळा!
Continues below advertisement
कोरोना महामारीमुळे लांबलेल्या ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्या अन् गावागावात निवडणुकांचा धुरळा उडू लागला आहे. लॉकडाऊनमुळे निपचित पडलेल्या खेड्यापाड्यात आता जल्लोष दिसत आहे. यंदाची निवडणूक अनेक दृष्टीने महत्वाची आहे. कारण, लोकप्रतिनिधींच्या आवाहनानंतर अनेक गावांमध्ये वाद-विवाद विसरून गावाच्या विकासासाठी विरोधक एकत्र आले. तर अनेक वर्षांपासून बिनविरोध होणाऱ्या गावांमध्ये निवडणूक लागल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. राज्यातील अशाच काही ग्रामपंचायतींचा आढावा.
Continues below advertisement