Election 2022 EC Guidelines :उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखांची घोषणा:ABP Majha

Continues below advertisement

कोरोना महामारी आणि ओमायक्रॉन संकटामध्ये उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखांची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुका सात टप्यात पार पडणार आहेत. तर पंजाब गोवा, उत्तराखंड राज्याच्या निवडणुका एकाच टप्प्यात पार पडणार आहेत. मणिपूरमध्ये दोन टप्यात निवडणूका होणार आहेत. 10 मार्च रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. निवडणूकांची घोषणा करताना निवडूक आयोगाने कोरोना नियमांचं पालन होणार असल्याचे सांगितलं. कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाने निर्बंध लागू केले आहेत. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदानाचा कालावधी एक तासाने वाढण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. निवडणूकीसाठी आयोगाने नियमावली जारी केली आहे, पाहूयात काय आहे...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram