Eknath Khadse ED Inquiry | एकनाथ खडसेंची ईडी चौकशी संपली, भूखंड घोटाळ्यात खडसे कसे फसले?
पुणे : भाजपचं कमळ सोडून राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हाती घेतलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंना ईडीने नोटीस धाडली आणि आज ते ईडी कार्यालयात चौकशीसाठी गेले असल्याची माहिती आहे. भाजप-शिवसेनेच्या सत्तेत महसूलमंत्री पदी असताना भोसरी एमआयडीसीत खरेदी केलेल्या जमीनीचा व्यवहार यानिमित्ताने पुन्हा चर्चेत आला आहे. एकनाथ खडसेंना पिंपरी चिंचवडच्या भोसरी एमआयडीसीतील भूखंड घोटाळ्याप्रकरणी आज हजर राहावं लागलं. याचं कारण आहे भोसरी एमआयडीसीमधील सर्व्हे नंबर 52ची जमीन.