ED Raid : प्रधानमंत्री आवास योजना घोटाळाप्रकरणी ईडीची छापेमारी, तब्बल नऊ ठिकाणी ईडीचा छापा
Continues below advertisement
आज सकाळी ईडीनं छापेमारी सुरु केली. एक दोन नाही तर तब्बल नऊ ठिकाणी ईडीनं छापा टाकला. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेतल्या घोटाळा प्रकरणात या धाडी टाकण्यात आल्या.छत्रपती संभाजीनगर शहरात गोरगरिबांसाठी ४० हजार घरं बांधताना महापालिकेनं सुमारे साडेचार हजार कोटी रुपयांच्या कामात नियमांचं उल्लंघन करून ठेकेदारांवर कृपा दाखवल्याचा आरोप आहे. या प्रकरणात मोठा घोटाळा झाल्याची बाब उघडकीस आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही चौकशीचे आदेश ही दिले होते. पंतप्रधान कार्यालयानं या घोटाळ्याची गंभीर दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले होते. या प्रकरणात ईडीकडे एक तक्रारही दाखल झाली....
Continues below advertisement
Tags :
ED Raid