कृषी विधेयकामुळे शेतकरी काही उद्योगांच्या दावणीला जातील, भाषातज्ज्ञ गणेश देवी यांचा गंभीर आरोप
Continues below advertisement
केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी विधेयकांमुळे शेतकऱ्यांसमोरच्या अडचणी आणखी वाढणार असून त्यामुळं खेड्यांच्या विघटनाला सुरुवात होईल अशी भीती भाषातज्ञ गणेश देवी यांनी व्यक्त केलीय. या विधेयकांमुळे शेतकऱ्यांसाठी खुली बाजारपेठ उपलब्ध होण्याऐवजी ते ठराविक उद्योगसमूहांच्या दावणीला बांधले जातील असा आरोप गणेश देवी यांनी केलाय. केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांच्या विरोधात शेतकर्यांमधे जागृती करण्यासाठी भाषातज्ञ गणेश देवी हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज ते पुणे जिल्ह्यातील शेतकर आणि कृषी उत्पन्न बाजार समिती मधील व्यापारी आणि आडत्यांशी संवाद साधतायत.
Continues below advertisement
Tags :
Farmers Of Maharashtra Farmer In Maharashtra Agriculture News Farmer Loss Farmers Maharashtra Farmers