डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराजांचं दीर्घ आजाराने निधन, 104 व्या वर्षी नांदेडमध्ये घेतला अखेरचा श्वास

Continues below advertisement
नांदेड : राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचे निधन झाले आहे. मृत्यूसमयी ते 104 वर्षाचे होते. गेल्या चार दिवसांपासून ते नांदेडला खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते. मात्र न्यूमोनिया असल्याने त्यांच्या प्रकृतीने उपचाराला साथ दिली नाही. सोमवारी (31 ऑगस्ट) त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. चार दिवसांपूर्वी ते जिवंत समाधी घेणार आहेत अशी अफवा पसरल्याने हजारो भाविक अहमदपूर इथे जमले होते.त्यातच आज अप्पांचे  निधन झाले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram