Dombivali Pollution |डोंबिवली MIDCमध्ये रंगीत आणि उग्र दर्प असलेलं केमिकलचं सांडपाणी रस्त्यावर सोडलं
Continues below advertisement
डोंबिवलीच्या खंबाळपाडा एमआयडीसी भागात आज एका कंपनीतून रासायनिक सांडपाणी थेट रस्त्यावर सोडलं जात असल्याचं समोर आलं. गडद निळ्या रंगाचं हे सांडपाणी खंबाळपाडा भागातील रस्त्यावरून वाहात जाऊन नाल्यात जात होतं. हाच नाला पुढे नागरी वस्तीतून वाहतो. उग्र दर्प असलेल्या या सांडपाण्यामुळे नागरिकांनाही त्रास सहन करावा लागतो. काही महिन्यांपूर्वी याच भागात कंपनीतून पंप लावून सांडपाणी नाल्यात सोडलं जात असल्याची बाब एबीपी माझानं समोर आणली होती. मध्यंतरी लॉकडाऊनच्या काळात कंपन्या बंद असल्यानं डोंबिवलीकर मोकळा श्वास घेत होते. मात्र आता पुन्हा ही प्रदूषणाची मालिका सुरू झाली असून याकडे एमपीसीबी आणि एमआयडीसी दुर्लक्ष करतेय.
Continues below advertisement