Doctor Mudassar Lambe यांचे राजकीय लागेबांधे कुणाशी?, वफ्फ बोर्डाच्या सदस्यावर फडणवीसांचे आरोप

वक्फ बोर्डाचे सदस्य डॉक्टर मुदस्सर लांबे यांचे दाऊदशी संबंध असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झालेत. लांबे यांची निवड फडणवीस यांनी त्यांच्या सत्ताकाळात केल्याचा आरोप नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक यांनी केला होता.....  तर डॉक्टर मुदस्सर लांबे गेली १५ वर्षे राष्ट्रवादीशी संबंधित असल्याचा दावा भाजपचे पदाधिकारी मोहित कंबोज यांनी केलाय. त्यांनी डॉक्टर लांबे आणि शरद पवार यांचा फोटो ट्विट करून सना मलिक यांच्या आरोपांना उत्तर दिलंय. तर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. लांबे यांच्या हस्ते सत्कार स्वीकारल्याचा व्हिडीओ ट्विट केलाय..... त्यामुळे डॉक्टर मुदस्सर लांबे नेमके कुणाशी संबंधित आहेत आणि त्यांची नियुक्ती कुणी केली यावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झालेत

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola