Aurangabad : अज्ञात हल्लेखोरांकडून डॉक्टरवर हल्ला ABP MAJHA
औरंगाबादमध्ये कर्करोग रुग्णालयातील एका डॉक्टरच्या घरात घुसून त्याना मारहाण करण्यात आले. डॉ अब्दुल राफे असं त्यांचं नाव आहे. डॉ. राफे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. औरंगाबादच्या कॅनॉट प्लेस परिसरात ही घटना घडलेय. पोटदुखीच्या बहाण्यानं डॉक्टरच्या घरात घुसलेल्या एका व्यक्तीनं हा हल्ला केलाय. हल्ल्यावेळी 'या डॉक्टरनं माझ्या बहिणीला मारलं' अशा आशयाचं वाक्य तो म्हणत होता. डॉ राफे यांना मारहाण करून पळून जाताना परिसरातल्या नागरिकांनी हल्लेखोराला पकडलं मात्र हाताला झटका देऊन हल्लेखोर पळून गेला. त्याची दुचाकी या परिसरातच असून त्याच्या आधारानं हल्लेखोराचा शोध सुरू आहे