Valentine's Day निमित्त फ्री कुपन अथवा फ्री गिफ्ट कार्डवर क्लिक करताय? सावधान, सायबर पोलिसांचे आवाहन

येत्या 14 फेब्रुवारीला व्हॅलेन्टाईन डे च्या निमित्ताने शहरातील अनेक मोठ्या हॉटेल्समध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्यामध्ये भाग घेण्याची प्रक्रियाही वेगळी असते. सध्या सोशल मीडियात अशा काही मोठ्या हॉटेल्सच्या नावे संदेश व्हायरल होत आहे आणि त्यामध्ये फ्री कुपन अथवा फ्री गिफ्टचे प्रलोभन देण्यात येतंय. सोबत खाली एक लिंकही देण्यात येते. तर अशा लिंकवर नागरिकांनी क्लिक करु नये, त्यांची आर्थिक फसवणूक होऊ शकते असे आवाहन सायबर सेलने केलं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola