Yashwant Jadhav | यशवंत जाधवांच्या ऑडिओ क्लिपवरून राडा, मुंबई महापालिकेत शिवसेना, भाजप आमने-सामने

मुंबई महानगर पालिकेच्या स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या दालनाबाहेर आज शिवसेना आणि भाजप नगरसेवक भिडले होते.आज स्थायी समिती ची बैठक होती.या वेळी स्थायी समिती अध्यक्ष यांची ऑडियो क्लिप आणि ई टेंडर रद्द बाबत हरकती चा मुद्दा भाजप चे प्रभाकर शिंदे सादर करणार होते.मात्र बैठकीत हा हरकती चा मुद्दा काढू दिला नाही.आणि शिवीगाळ केली असल्याचा आरोप भाजप ने केले आहे.यानंतर भाजप च्या नगरसेवकांनी स्थायी समिती अध्यक्षांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या दिला.या वेळी त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली.याच दरम्यान त्या ठिकानी स्थायी समिती अध्यक्ष आले असता त्यांना कार्यालयात जाण्यास अडविण्यात आले.या वेळी शिवसेना नगरसेवक ही भडकले आणि त्यांनी देखील भाजप च्या विरोधात घोषणाबाजी केली.मात्र या बाबत यशवंत जाधव यांनी हे आरोप फेटाळून लावले.मी शिंदे यांना वेळ दिला होता मात्र त्यांनी तो घेतला नाही आणि सभा संपल्यावर गोंधळ सुरू केला.भाजप मला कंत्राटदार च्या आडून ब्लकमेल केले जाते आहे असा आरोप जाधव यांनी केला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola