Pimpri | भाजप-राष्ट्रवादीमध्ये वाद,अजितदादांऐवजी चंद्रकांत पाटलांना बोलावल्याने राष्ट्रवादी आक्रमक
पुण्यानंतर पिंपरी चिंचवड भाजप आणि राष्ट्रवादीमधील वाद उफाळून आला. या वादामुळं पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सदनिकेची सोडत कार्यक्रम रद्द करण्याची नामुष्की भाजपवर ओढवली. भाजप आणि राष्ट्रवादीमधील श्रेयवादाच्या राजकारणात गोरगरीब अर्जदारांची गळचेपी झाली. महापालिकेच्या पत्रिकेत प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या शुभहस्ते सोडत होणार असल्याचं नमूद होतं. मात्र भाजपने प्रत्यक्षात अजित पवारांना निमंत्रण दिलंच नसल्याचा आरोप करत राष्ट्रवादीने निदर्शने केली.