Vikas Dubey Encounter | दुबे मध्यप्रदेशमध्ये कुणाच्या भरवशावर आला?, दिग्विजय सिंहांचा सवाल

दिग्विजय सिंह यांनी म्हटलं आहे की, ज्याची शंका होती तेच घडलं. विकास दुबेचे कोणकोणत्या राजकीय लोकांशी, पोलिस आणि अन्य सरकारी लोकांशी संपर्क होता, हे आता समोर येणार नाही. मागील 3-4 दिवसात विकास दुबेच्या 2 अन्य साथिदारांचाही एन्काऊंटर झाला होता. या तिन्ही एन्काऊंटरचा पॅटर्न एकसारखाच का आहे? असा सवाल दिग्विजय सिहांनी उपस्थित केलाय.  तसंच हे देखील माहिती करुन घेणं आवश्यक आहे की, विकास दुबेने मध्यप्रदेशचं उज्जैन महाकाल मंदिरचं सरेंडर होण्यासाठी का निवडलं? मध्यप्रदेशच्या कोणत्या प्रभावशाली व्यक्तिच्या भरवशावर तो उत्तर प्रदेश पोलिसांच्या एन्काउंटरपासून वाचण्यासाठी आला होता? असा देखील प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola