Diego Maradona Passes Away | दिग्गज फुटबॉलपटू दिएगो मॅराडोनाचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Continues below advertisement
अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी निधन झाले. अर्जेंटिनाच्या मीडियाने याबाबत माहिती दिली. मॅराडोना यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मॅराडोनाच्या अनेक चाचण्या हॉस्पिटलमध्ये घेण्यात आल्या. एका स्कॅनमध्ये मेंदूत ब्लड क्लोट होण्याची बाब उघडकीस आली. यानंतर त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली. काही दिवसांपूर्वी मॅराडोना यांची कोरोना टेस्ट देखील झाली होती. परंतु, त्याचा अहवाल निगेटिव्ह आली. 1986 मध्ये, त्यांनी अर्जेटिनाला फुटबॉल विश्वचषक जिंकून दिला होता.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram