Dhule Nandurbar MLC Election : धुळे नंदुरबारमधून भाजपच्या अमरीश पटेल यांना 430 पैकी तब्बल 332 मतं

Continues below advertisement

धुळे : धुळे आणि नंदुरबार स्थानिक स्वराज संस्थेच्या विधानपरिषद पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत भाजपच्या अमरीश पटेल यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. अमरीश पटेल यांना 332 तर काँग्रेसचे अभिजित पाटील यांना 98 मतं मिळाली आहेत. धुळे आणि नंदुरबार स्थानिक स्वराज संस्थेच्या पोटनिवडणुकीत 434 पैकी 4 मतं बाद झाली तर 430 मतं वैध ठरली. 216 प्रथम प्राधान्याची मतं घेणारा उमेदवार जिंकणार असं गणित होतं. भाजप उमेदवार अमरीश पटेल यांनी 332 मतं घेत पाटील यांच्यावर विजय मिळवला आहे.


काँग्रेसमधून भाजपात आलेल्या अमरीश पटेल तसेच भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या अभिजीत पाटील यांच्यात ही सरळ लढत झाली. अमरिश पटेल यांनी विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा 30 सप्टेंबरला राजीनामा दिला होता. त्यांचा विधान परिषद सदस्यत्वाचा कालावधी 14 डिसेंबर 2021 या दिवशी पूर्ण होत होता. मात्र तत्पूर्वीच त्यांनी राजीनामा दिल्यानं केवळ 12 महिन्यांचा कालावधी निवडून येणाऱ्या उमेदवाराला मिळणार आहे. काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात झालेल्या राजकीय घडामोडींचा या निवडणुकीत भाजपला फायदा होणार कि महाविकास आघाडी सरकारला फायदा होणार याकडं लक्ष लागून होतं. मात्र भाजपमध्ये गेलेल्या अमरीश पटेल यांनी त्यांचा गड राखला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram