Dhule New Idols : मोगलाईमधील मंदिरात नवीन मूर्तींची प्राणप्रतिष्ठा, 3 दिवसांपूर्वी मूर्तीची विटंबना
धुळ्यातील मोगलाईमध्ये तीन दिवसांपूर्वी मंदिरातील मूर्तीची विटंबना झाल्याची घटना घडली होती.. या घटनेचा निषेध म्हणून मोर्चादेखील काढण्यात आला होता... अखेर आज या मंदिरात नव्याने सर्व मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे.. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त मंदिर परिसरात आज महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले आहे.. स्थानिक नागरिकांसह विविध हिंदुत्ववादी संघटनांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी पूर्ण केली आहे..