Dhule Unseasonal Rain: शिरपूरमध्ये 33 टक्के पिकं नष्ट; पालकमंत्री गिरीश महाजनांकडून पंचनाम्याचे आदेश
Continues below advertisement
अवकाळी पावसामुळे एकट्या धुळे जिल्ह्यात १० हजारांहून अधिक शेतकऱ्यांना फटका बसला आहे.. साक्री आणि शिरपूर तालुक्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झालं आहे. शिरपूर तालुुक्यात ३३ टक्क्यांहून अधिक पिकं नष्ट झाली आहेत... तर साक्रीमध्ये ३० टक्क्यांहून अधिक पिकांना फटका बसला आहे.. काढणीला आलेली पिकं अवकाळी पावसामुळे पुरती झोपून गेली. पेरणी आणि मशागतीचा खर्च कुठून भरून काढायचा हा प्रश्न बळीराजासमोर उभा ठाकलाय.. दुसरीकडे, पालकमंंत्री गिरीश महाजन यांनी काही दिवसांपूर्वीच नुकसानाची पाहणी करून तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले.. मात्र तरीही, पंचनामे सुरू झालेले नाहीत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
Continues below advertisement