Devendra Fadnavis Dhule Speech : पुढील 5 वर्ष वीज बिलातून मुक्ती, मोदींसमोर फडणवीसांची मोठी घोषणा

Devendra Fadnavis Dhule Speech : पुढील 5 वर्ष वीज बिलातून मुक्ती, मोदींसमोर फडणवीसांची मोठी घोषणा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर आज राज्यात विविध ठिकाणी राजकीय सभा होत आहे. धुळ्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, तर सांगलीतून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मैदानात उतरले आहेत. धुळ्यातील सभेत नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी महायुती सरकारच्या योजना आणि विविध प्रकल्पाबाबत माहिती दिली. तसेच महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यामधील वाढवण बंदराबाबतची महत्वाची माहिती देखील नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिली.

इलेक्ट्रॉनिक वाहन परियोजना, स्टील प्रोजेक्ट, ग्रीन प्रोजेक्ट असे राज्यातील वेगवेगळ्या भागात स्थापित केले जात आहे. महाराष्ट्रात वाढवण बंद देखील होत आहे. मूलभूत सुविधा मुळे रोजगाराच्या नवीन संधी मिळत आहेत. वाढवण बंदरासाठी मी आलो होतो, तेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणाले, एवढे सर्व करत आहात तर तिथे एक विमानतळ देखील द्या...मी आज देवेंद्र फडणवीसांना सांगतो...जेव्हा राज्यात महायुतीचे सरकार येईल,  आचारसंहिता संपले, तेव्हा वाढवण येथील विमानतळाबाबत देखील निर्णय घेऊ असं आश्वासन नरेंद्र मोदी यांनी दिले. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola