Dhule कृषी उत्पन्न बाजार समिती आजपासून 14 जुलैपर्यंत बंद, तीन जण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने निर्णय
Continues below advertisement
धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत कोरोनाचा शिरकाव झाल्याने आजपासून 14 जुलैपर्यंत समितीतील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत. धुळ्याच्या बाजार समितीत गेले तीन महिने एक दिवसाआड व्यवहार सुरु होते. गर्दी नियंत्रित ठेवण्यासाठी टोकन पद्धतीने खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरु होते. पण बाजार समितीशी संबंधित तिघांना कोरोनाची लागण झाल्याने बाजारसमिती आजपासून 14 जुलैपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. शहरात मात्र भाजीपाला विक्री होणार असल्याने या बंदचा फारसा परिणाम जाणवणार नाही असं जाणकारांचं म्हणणं आहे.
Continues below advertisement