Tuljabhavani Mata Gudi Padwa : तुळजाभवानी मातेच्या मंदिरात गुढीपाडवा, देवीची करण्यात आली अलंकार पूजा
Continues below advertisement
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात परंपरेनुसार गुढीपाडवा सण साजरा करण्यात आला. साडे तीन शुभ मुहूर्तांपैकी आजचा एक मुहूर्त असल्यानं, आणि मराठी नवीन वर्षाचा पहिलान दिवस असल्यानं देवीची अलंकार पूजा करण्यात आली. देवीची पहाटे आरती करुन तुळजाभवानी मातेच्या मंदिरावर गुलाबी रंगाच्या साडीची गुढी उभारून भगवा ध्वज लावण्यात आला. तुळजाभवानी मातेचे मुख्य पुजारी महंत तुकोजी बुवा, वाकोजी बुवा यासह पुजारी भक्तांच्या उपस्थितीत गुढी उभारून देवीला साखरेचा हार अर्पण करण्यात आला. तुळजाभवानीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
Continues below advertisement