Geranium Farm Dharashiv : ऊसाला पर्याय म्हणून जिरेनियम शेती, उस्नानाबादच्या शेतकऱ्याचा प्रयोग
Geranium Farm Osmanabad : ऊसाला पर्याय म्हणून जिरेनियम शेती, उस्नानाबादच्या शेतकऱ्याचा प्रयोग
ऊसाला पर्याय म्हणून उस्मानाबाद जिल्ह्यातील तरुण शेतकरी मदन कावळे यांनी जिरेनियम शेतीचा नवा प्रयोग सुरू केलाय. धाराशिव जिल्ह्यातील कावळेवाडी गावातील मदन कावळे यांचे बी ए डी एड शिक्षण झाले असून इंग्लिश स्कूल वर शिक्षकाची नोकरी करून आपला उदरनिर्वाह होत नसल्याने या तरुणांने परिसरातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन जिरेनियम शेतीचा यशस्वी केला. मदन कावळे यांनी स्वतःची दहा लाखाची पदरमोड करून आपल्या शेतामध्ये जिरेनियम च्या पाल्यापासून सुगंधी तेल काढण्याचा छोटा कारखाना शेतात सुरू केला आहे. शेतकऱ्याच्या शेतातील जिरेनियम चा पाला तोडणी करून आपल्या या युनिटवर आणायचा मोठ्या टाके मध्ये हा पाला गच्च भरून घ्यायचा. बॉयलर मध्ये शेतातीलच लाकडे वापरून एक हजार भावाची वाफ तयार करायची आणि या भरलेल्या पाण्याने भरलेल्या टाकीत ही वाफ सोडायची पाला स्टीम करून घ्यायचा मग दीड ते दोन तासाच्या मेहनतीनंतर या टाकीतून पाणी आणि तेल यायला सुरुवात होते. याच टाकीला तेल आणि पाणी सेपरेटर बसविल्याने तेल वेगळे करून हे तेल मुंबईच्या केळकर या व्यापाऱ्यांना विकून प्रति लिटर दहा ते बारा हजार रुपये मिळतात. दररोज 5 ते 6 टन गाळप करून मदन यांना शेतकऱ्यांचे प्रति टन पाच हजार रुपये देऊन आणि तेल काढण्याचा खर्च वजा करून महिन्याकाठी दीड ते दोन लाख रुपये निव्वळ नफा राहतो नोकरीच्या मागे न लागता स्वतः उद्योग धंदा करून मदन कावळे यांनी तरुणांच्या समोर एक वेगळा आदर्श ठेवलाय. धाराशिव तालुक्यातील आरणी गावातील अडसुळे यांनी जिरेनियम शेतीची माहिती घेऊन मदन कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या दीड एकर मध्ये सहा महिन्यापूर्वी जिरेनियमची लागवड केली. मेहनत आणि नियोजनाच्या जोरावर जिरेनियमची शेती भरली अडसुळे यांनी जिरेनियमचा पहिला तोडा घेऊन प्रति टन एक लाख वीस हजाराचे उत्पन्न मिळवले जिरेनियम पासून मिळणाऱ्या सुगंधी तेलाचा भाव सध्या कमी झाल्याने शेतकऱ्याच्या हाती कमी पैसे येऊ लागले आहेत. जिरेनियमची एकर शेतीसाठी 80 हजार रुपयाची रोपे आणि लागवडीचा खर्च 20000 असे मिळून एक लाख रुपये खर्च येतो एक एकर मध्ये 35 चे 40 टन पाला मिळतो. यामधून प्रति टन दहा ते बारा हजार रुपये उत्पन्न मिळून वर्षाकाठी चार तोडे घेतल्यानंतर 40 टनाचे चार लाखाचे उत्पन्न शेतकऱ्याला मिळते, म्हणजे उसाच्या तुलनेत खर्च वजा केला तरी शेतकऱ्याला एकरी दोन लाख रुपये निव्वळ नफा राहतो. जिरेनियमची शेती दुष्काळग्रस्त ग्रस्त मराठवाड्यातील शेतकऱ्यांना प्रगती कडे नेणारी ठरल्याचे चित्र तयार होत असल्याने जिरेनियमची शेती शेतकऱ्यांना वरदानच ठरणार हे आता नक्की झालंय.