Dharashiv Vasant Dada Bank : वसंतदादा बँकेच्या चेअरमनसह संचालक, कर्मचाऱ्यांवर गुन्हा : ABP Majha

Continues below advertisement


धाराशिव येथील वसंतदादा बँकेच्या चेअरमनसह संचालक, कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.  ठेवीदारांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. यापुर्वी काँग्रेसमध्ये असलेले आणि बँकेत आर्थिक घोटाळा केल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश घेतलेले नेते विजय दंडनाईक हे वसंतदादा नागरी सहकारी बॅकेचे संस्थापक आणि चेअरमन आहेत. वसंतदादा बँकेवर रिझर्व बँकेने कारवाई करून बँकींग परवाना रद्द केला. ठेवीदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे काढले. कालांतराने ठेवीदारांना पाच लाखापर्यंतच्या ठेवी परत मिळाल्या. मात्र,  पाच लाखांपेक्षा जास्तीच्या ठेवी असणारे ठेवीदार अडकले होते. ही रक्कम २५ कोटीच्या आसपास आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram