Dharashiv Crime on Polling Station : धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ राडा, चाकूहल्ल्यात एकाचा मुत्यू
Dharashiv Crime on Polling Station : धाराशिव: राज्याच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला गालबोट लागलं असून धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळच झालेल्या चाकू हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला आहे. धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील पाटसांगवी या ठिकाणी ही हत्येची घटना घडली आहे. राजकीय वादातून ही हत्या झाल्याची माहिती असून या ठिकाणचे वातावरण अधिक चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दोन गटांतील वादाचं पर्यवसन चाकू हल्ल्यात झालं आणि त्यात एकाचा मृत्यू झााल. या हल्ल्यात इतर तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.