Dharashiv Crime : माणूस की हैवान?पळून जातील म्हणून कंत्राटदारानं मजूरांना साखळदंडांनं ठेवलं बांधून
धाराशिव जिल्ह्यातल्या खामसवाडी, ढोकी या भागात धक्कादायक प्रकार. विहिरीचे काम करण्यासाठी आणलेल्या मजुरांना साखर दंडाने बांधून ठेवून काम करवून घेत असल्याची उघड. पोलिसांना याची माहिती मिळाल्यावर पोलिसांच्या छापा टाकला त्यावेळी खामसवाडी परिसरात 11 मजूर साखर दंडाने बांधलेले आढळून आले. धाराशिव जिल्ह्यातल्या भूम तालुक्यातला कंत्राटदार असून त्याने हिंगोली छत्रपती संभाजीनगर इथून शेतमजूर आणलेले होते हे मजूर दिवसभर विहिरीवर काम करत होते रात्रीच्या वेळेला या मजुराने पळून जाऊ नये म्हणून त्यांना साखर दंडाने बांधून ठेवले जात होतं. शौचास जायचं असेल किंवा जेवण करायचं असेल तरी या मजुरांना परवानगी दिली जात नव्हती. पोलिसांनी छापा टाकला त्यावेळेला हे मजूर घाबरलेल्या अवस्थेत साखर दंडाने बांधलेले आढळून आले. पोलिसांनी त्यांची सुटका केली. काल रात्री हे मजूर आपल्या गावी परत गेले