Dharavshiv Crime : धारशिव तहसील कार्यालयाच्या इमारतीवर चढून शेतकऱ्याचा आयुष्य संपवण्याचा प्रयत्न
Continues below advertisement
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी धारशिव तहसील कार्यालयाच्या इमारतीवर चढून शेतकऱ्यानं आत्महत्येचा प्रयत्न केलाय. चार वर्षापासून शेताला जाण्यासाठी रस्ता उपलब्ध करून देत नसल्याने तहसील कार्यालयाच्या इमारतीवरुन उडी मारण्याचा प्रयत्न या शेतकऱ्यांनं केलाय. पोलीस वेळीच या ठिकाणी दाखल झाल्यानं पुढचा अनर्थ टळलाय. महेश माळी असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचं नाव आहे. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर 15 दिवसात प्रश्न निकाली काढू असे प्रशासनाने लेखी पत्र देण्याचे मान्य केल्यानं या शेतकऱ्यानं आंदोलन मागे घेतलंय.
Continues below advertisement