Dhananjay Munde on Pritam Munde : निधीवरुन धनंजय मुंडेंचा प्रीतम मुंडेंवर अप्रत्यक्षपणे टीका
मुंडे बंधू-भगिनींमधील राजकीय वाद नवीन नाही. आता केंद्र सरकारच्या विकासनिधीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी खासदार प्रीतम मुंडे यांच्यावर टीका केलीय. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असूनही परळी वैजनाथसाठी केंद्राकडून एक रुपयाचाही निधी येऊ शकला नाही, हे इथल्या लोकप्रतिनिधींचं अपयश आहे अशा शब्दांत धनंजय मुंडेंनी खासदार प्रीतम मुंडेंवर अप्रत्यक्ष निशाणा साधलाय..