Kolhapur | सतेज पाटलांकडून सत्तेचा गैरवापर, धनंजय महाडिकांचे सतेज पाटलावर गंभीर आरोप
कोल्हापुरात महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा मुन्ना विरुद्ध बंटी असा सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे. कारण काल झालेल्या पत्रकार परिषदेत धनंजय महाडिक यांनी सतेज पाटलांवर गंभीर आरोप केले आहेत. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या मालकीच्या सयाजी हॉटेलचा 15 कोटींचा घरफाळा थकबाकी असताना पालिका अधिकारी गप्प कसे असा सवाल महाडिक यांनी केलाय. तर सतेज पाटलांच्या वतीनं कोल्हापुरातल्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी महाडिकांना प्रत्युत्तर दिलंय.