Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस अमित शाह यांच्या भेटीला
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीत पोहोचले आहेत. हर्षवर्धन पाटील, विनय कोरे, धनंजय महाडिक, रणजीतसिंह निंबाळकर हेदेखील त्यांच्यासोबत आहेत. साखरेच्या प्रश्नावर बैठक असल्याचं सांगितलं जातं आहे. कृषीमंत्री तोमर आणि अन्नपुरवठा मंत्री पासवान यांच्या भेट घेणार आहेत. यासोबत देवेंद्र फडणवीस अमित शहा यांची भेट घेणार का याचीही उत्सुकता आहे.