सरकारनं गरिबांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं, शेतकरी, पुराच्या मुद्द्यावर सरकार गप्प - फडणवीस
मुंबई : विधीमंडळाच्या दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनाची आज सांगता झाली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणात विरोधकांवर चांगलीच फटकेबाजी केली. आरेतील झाडे तोडण्याच्या मुद्द्यावर बोलताना जी कामं करायची ती आम्ही दिवसाढवळ्या करतोय, रात्रीच्या अंधारात नाही. प्रत्येक पाऊल शांततेने उचलावं लागणार आहे, ओरडून बोलल्याने कोरोना होतो असाही अप्रत्यक्ष टोला उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला. पुढचे अनेक वर्षे तुमचे सहकार्य असेच राहू दे, असा चिमटाही मुख्यमंत्र्यांना विरोधकांना घेतला.
Tags :
Maharashtra Monsoon Session 2020 Fadnavis Maharashtra State Assembly Maharashtra Monsoon Session CM Uddhav Thackeray Speech Rainy Session Monsoon Session Vidhan Parishad Vidhan Sabha Uddhav Thackeray Maharashtra Government BJP Ajit Pawar Maha Vikas Aghadi Coronavirus Covid 19