Devendra Fadnavis On Rahul Gandhi : राहुल गांधींकडून जाणीवपूर्वक सावरकर यांचा अपमान : देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis On Rahul Gandhi : राहुल गांधींनी सावरकरांवर केलेल्या टीकेचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निषेध केला आहे. "जाणीवपूर्वक सावरकर यांना अपमानित केल जात आहे, अंदमानच्या काळकोठडीत सावरकरांनी शिक्षा भोगली, त्यांच्यामुळे अनेक क्रांतीकारकांना प्रेरणा मिळाली, राहुल गांधींंना कोणताही इतिहास माहीत नाही असं प्रत्युत्तर फडणवीसांनी दिलं. उद्धव ठाकरे राहुल गांधींचा निषेध करणार का? असा प्रश्नही त्यांनी विचारला.