Ajit Pawar slams Officers| अजित पवारांचा नुकसान पाहणी दौरा,जुन्नरच्या अधिकाऱ्यांचाच केला 'पंचनामा'

पिंपरी-चिंचवड : निसर्ग चक्रीवादळाने कोकणासह पुणे जिल्ह्याचे ही मोठे नुकसान केले. त्यामुळेच पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज नुकसानग्रस्त दौरा केला. बुधवारी चक्रीवादळाने हैदोस घातला, अक्षरशः नागरिक मेटाकुटीला आले. या प्रकोपाला दोन दिवस उलटले तरी ही हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच पंचनामे झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे जुन्नर तालुक्यातील दौऱ्यात एका अधिकाऱ्यांचाच दादांनी त्यांच्या खास शैलीत 'पंचनामा' केला. दोन दिवसांत पंचनामे होणे अपेक्षित होतं असं ही खडसावले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola