OBC | महावितरण भरतीसाठी ओबीसी उमेदवारांना नियुक्तीची मागणी, ओबीसी समाजाचं प्रकाशगडावर आंदोलन
महावितरणमधील कनिष्ठ अभियंता पदासाठी भरती झाली होती. यात नियुक्ती झालेल्यांना अद्याप नियुक्तीपत्र देण्यात आलं नाही. यासाठी ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी मावितरणच्या प्रकाशगड कार्यालयावर आंदोलन करण्यात आलं. ओबीसीच्या साडे आठ हजार मुलांना अजूनही नियुक्ती मिळाली नाही. या सर्व उमेदवारांना तात्काळ नियुक्तीपत्र मिळालं नाही तर उर्जा मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे.