'SEBC, EWS वरुन संभ्रम नाही, जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न', अशोक चव्हाण यांचा आरोप

Continues below advertisement
मुंबई : मराठा आरक्षणाची प्रक्रिया न्यायप्रविष्ट असताना एसईबीसी उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून शैक्षणिक प्रवेश देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. या निर्णयावरुन सरकारवर सडकून टीका केली जात आहे. ईडब्लूएस आरक्षण घेतल्यास न्यायप्रविष्ट असलेल्या मराठा आरक्षणाला धोका निर्माण होईल, अशी भीती काही जणांकडून व्यक्त केली जात आहे. याबाबत मराठा उपसमितीचे प्रमुख आणि मंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. एबीपी माझाशी बोलताना ते म्हणाले की, मला वाटत कुठेही संभ्रमाचा वातावरण नाहीये, संभ्रमचा वातावरण निर्माण करण्याचा हेतुपरस्पर प्रयत्न केला जातोय, असं चव्हाण म्हणाले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram