Farmer Protest : शेतकरी आणि सरकारमध्ये बैठक, 40 शेतकरी नेते विज्ञान भवनात दाखल
Continues below advertisement
नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांविरोधात मागील सात दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर हजारोंच्या संख्येने शेतकरी जमले आहेत. शेतकरी मागे हटण्यास तयार नसल्याने आता त्यांचं आंदोलन आणखी चिघळू नये यासाठी केंद्र सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत. आज शेतकरी संघटनांचे प्रनिनिधी कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्याशी बातचित करणार आहेत. याआधी मंगळवारी शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची केंद्रीय मंत्र्यांसोबत बैठक पार पडली होती. परंतु, ही बैठक निष्फळ ठरली होती.
Continues below advertisement