Delhi :दिल्लीतल्या निवासी डॉक्टरांचं आंदोलन , नियंत्रित करण्यासाठी करावा लागला लाठीमार : ABP Majha
नीट-पीजी काउन्सेलिंगमध्ये होत असलेल्या दिरंगाईमुळे आक्रमक झालेल्या दिल्लीतल्या निवासी डॉक्टरांचं आंदोलन काल चांगलंच पेटलं. पोलिस आणि डॉक्टरांमध्ये झालेल्या बाचाबाचीचं पर्यावसन मोठ्या गोंधळात झालं. पोलिसांना आंदोलकांना नियंत्रित करण्यासाठी लाठीमार करावा लागला. त्यानंतर आज निवासी डॉक्टरांनी कामबंद आंदोलन पुकारलं. डॉक्टरांनी आपले लॅब कोट रुग्णालयांना परत करत आपला प्रातिनिधीक निषेध नोंदवला. डॉक्टरांच्या कामबंद आंदोलनामुळे सफदरजंग, आरएमएल, लेडी होर्डिंग या मोठ्या रुग्णालयातल्या कामकाजावर मोठा परिणाम झालाय
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Delhi Marathi News Hospital ABP Maza Top Marathi News Doctor दिल्ली डॉक्टर ताज्या बातम्या Protesters ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron दिल्ली Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv डॉक्टर