Delhi Blast : दिल्लीतील हल्ल्यामागे पाकचा हात? Pok च्या माजी पंतप्रधानाची मोठी कबुली
Delhi Blast : दिल्लीतील हल्ल्यामागे पाकचा हात? Pok च्या माजी पंतप्रधानाची मोठी कबुली
आता एक मोठी बातमी आहे, दिल्लीत झालेल्या स्फोटासंदर्भातली..
ऐतिहासिक लाल किल्ला परिसरातील मेट्रो स्टेशनजवळ १० नोव्हेंबर रोजी भयावह स्फोट झाला होता.. या स्फोटात बारा निष्पाप नागरिकांचा बळी गेला.. तर वीसहून अधिकजण जखमी झाले होते... आता या हल्ल्याची पाकिस्तानने कबुली दिलीय.. पाकव्याप्त काश्मीरचे माजी पंतप्रधान चौधरी अन्वरूल हकने, पाकिस्तानच्या संसदेत बोलताना, हा दावा केलाय.. बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्याविरोधात हत्यार उचलणाऱ्या बलूच लिबरेशन आर्मीने जे हल्ले सुरू केले आहेत.. त्यासाठी भारताला जबाबदार ठरवत.. त्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानी सैन्याने भारतात हल्ले करवल्याची दर्पोक्ती अन्वरूल हकने केलीय.. याआधी एप्रिल महिन्यातसुध्दा अन्वरुल हकने भारताला रक्तपाताची धमकी दिली होती..