Delhi Protest 100 Days | शेतकरी आंदोलनाचा आज 100 वा दिवस,राकेश टिकैत म्हणाले,आंदोलन असंच चालत राहणार
Farmer Protest 100 days : दिल्लीतल्या ऐतिहासिक शेतकरी आंदोलनाला आता शंभर दिवस पूर्ण झालेत. राजधानी दिल्लीला अजूनही चार सीमांवर शेतकऱ्यांचा वेढा कायमच आहे. या शंभर दिवसात आंदोलन अनके टप्प्यांमधून गेलं. 26 नोव्हेंबर ते 5 मार्च... दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाला आता तब्बल शंभर दिवस पूर्ण झालेले आहेत. पण अद्यापही राजधानीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेल्या शेतकरी आंदोलकांचा निर्धार कमी झालेला नाही. शंभर दिवसांत आंदोलन अनेक टप्प्यांमधून गेलं. पण अजूनही शेतकरी आपल्या मुख्य मागणीवरुन हटलेले नाहीत. कायदा मागे घेतल्याशिवाय माघार नाही ही पहिल्या दिवशीची मागणी आज शंभर दिवसानंतरही कायम आहे.
Tags :
Delhi Farmer Protest Agricultural Bill Delhi Agriculture Bill Delhi Protest Farmer Protest Rakesh Tikait