Rajesh Tope | दिवाळीनंतर लग्न समारंभात नागरिकांची संख्या आणि मंदिरांबाबत निर्णय होण्याची शक्यता
Continues below advertisement
युरोपीयन देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे त्या देशांत पुन्हा लॉकडाऊन करण्यात आलं आहे. त्यामुळे देश आणि राज्यातही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जाती आहे. मात्र राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता कमी असून आली तरी राज्य सरकारची पूर्ण तयारी असल्याची माहिती टोपे यांनी दिली आहे. त्याचबरोबर याआधी लग्नसमारंभात पन्नास लोकांना परवानगी दिली होती त्यांच्या संख्येत वाढ करण्याचा विचार सरकार करत असल्याचंही टोपे यांनी म्हंटलं आहे. तर मंदिरं उघडण्याबाबतचा निर्णय हा दिवाळीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चर्चा करून घेतील अशी माहितीही राजेश टोपे यांनी दिली आहे.
Continues below advertisement
Tags :
Corona Patient Recovery Cm Thackeray Temple Mumbai Corona Diwali Rajesh Tope Corona Corona Virus