#CoronaVirus च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जालन्यात जमावबंदीचे आदेश लागू, मोर्चे, उपोषणांवर बंदी
Continues below advertisement
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जालन्यात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. जिल्ह्यात मोर्चे, उपोषणं, निदर्शनं आणि आंदोलनं यावर बंदी घालण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी हे आदेश दिले. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये पुन्हा वाढ होतेय. त्यामुळे जिल्ह्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा कठोरपणे राबवण्यात यावा अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांना दिल्यात. त्याचबरोबर जिल्ह्यातील विविध कार्यालयांमध्ये निवेदनं देण्यासाठी गर्दी होतेय. या पार्श्वभूमीवर जमावबंदीचे हे आदेश देण्यात आलेत.
Continues below advertisement