AC Local on Central Railway | सीएसएमटी ते कल्याण एसी लोकल सुरू, आता मध्य रेल्वेवरही गारेगार प्रवास
आजपासून मध्य रेल्वेवर एसी लोकल सुरू करण्यात आली आहे. सीएसएमटी ते कल्याण या मार्गावर ही लोकल धावते आहे. या एसी लोकल च्या दिवसाला दहा फेऱ्या प्रायोगिक तत्त्वावर चालवल्या जाणार आहेत.प्रवाशांचा प्रतिसाद बघून येणाऱ्या काळात या फेऱ्या वाढवल्या जातील.सुरुवातीला जरी या लोकल ला अल्प प्रतिसाद मिळाला तरी जेव्हा सामान्य नागरिकांना देखील या लोकल मध्ये प्रवासाची मुभा मिळेल तेव्हा या लोकल ला मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.सध्या तरी मध्य रेल्वे च्या प्रवाश्यांनी या लोकल चे स्वागत केले आहे.